बर्थ डे पार्टी महाग पडली, मुलाचा कापावा लागला हात

बर्थ डे पार्टीनंतर चार दिवस मुलाचा हात सुजला होता
Surgery
Surgery

बंगळुरु: मित्राच्या घरी बर्थ डे पार्टीला (birthday party) जाणं एका १७ वर्षीय मुलाला महाग पडलं आहे. बर्थ डे पार्टीमध्ये या मुलाला एक इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर मुलाच्या हाताच्या कोपराकडच्या भागामध्ये विष तयार (drugs poisons) झालं. त्यामुळे डॉक्टरांना या मुलाचा संपूर्ण हात कापावा लागला. बंगळुरुमध्ये (Bengaluru) ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने आपल्या मुलाच्या हातावर ड्रग्जचं इंजेक्शन दिलं, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Bengaluru boy loses arm after friend injects drugs poisons him at birthday party)

त्यामुळे बर्थ डे पार्टीनंतर चार दिवस आपल्या मुलाचा हात सुजला होता. जेव्हा या मुलाला डॉक्टरकडे नेण्यात आले, तेव्हा तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हातामध्ये विषारी पदार्थ असल्यामुळे हात कापण्याचा सल्ला दिला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

Surgery
मनसेचे राजू पाटील 'दिबां'च्या नावासाठी असलेल्या आंदोलनात सहभागी

"बंगळुरुच्या चामराजपेट भागामध्ये पार्टीसाठी मी गेलो होतो. त्यावेळी आरोपीने काही गोळ्या पाण्यात मिसळून मला दिल्या" असे मुलाने सांगितले. आरोपी व्हॉलीबॉल कोच आहे. गोळ्या मिसळलेले पाणी पिल्यानंतर माझा हात सूजला. कुटुंबीय मुलाला जेव्हा संजय गांधी रुग्णालयात घेऊन गेले, त्यावेळी डॉक्टरांनी विष शरीरातून काढण्यासाठी हात कापावा लागेल, असे मुलाच्या पालकांना सांगितले.

Surgery
नवी मुंबई आंदोलन: नऊ वर्षाच्या सईने चालवली ३० किमी सायकल

कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आयपीसीच्या कलम ३२८ अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. आरोपी कोच गाडी चोरीच्या प्रकरणात आधीपासूनच तुरुंगात आहे. आरोपी विरोधात पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांना वैद्यकीय अहवाल देण्याची विनंती केली आहे. आरोपीची चौकशी करता यावी, यासाठी त्याच्याविरोधात वॉरंट मिळवण्यासाठी पोलीस आता कोर्टात जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com