'गे' प्राध्यापकाच्या हकालपट्टीने समलैंगिकांचे प्रश्न ऐरणीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

बंगळूर : समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करणारे सहयोगी प्राध्यापक अॅश्ले टेलिस यांची येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉलेजविरोधी कामे करणे आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या संवेदना दुखावल्या जात असल्याच्या कारणावरून टेलिस यांना काढून टाकण्यात आले आहे. या 'गे' प्राध्यापकाच्या हकालपट्टीमुळे समलिंगी लोकांना समाजात मिळणाऱ्या वेगळ्या वागणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

सेंट जोसेफ कॉलेज हे बंगळूर शहरातील सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. प्रा. टेलिस इंग्रजी विभागात काम करीत होते. त्यांच्यावरील कारवाईमुळे समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

"मी बी.कॉम. द्वितीय वर्षाच्या वर्गावर शिकवत असताना 9 मार्च रोजी मला खाली बोलावून कॉलेजचे प्राचार्य फादर व्हिक्टर लोबो यांना ताबडतोब भेटा असे सांगण्यात आले. तिथे गेलो, मात्र वर्गात विद्यार्थी माझी वाट पाहत असताना त्यांनी मला त्यांच्या कार्यालयाबाहेर 10 मिनिटे वाट पाहायला लावली. नंतर त्यांनी आत बोलावून मला सांगितले की, तुमच्या वैयक्तिक मतांनी विद्यार्थी विचलित झाले आहेत. व्यवस्थापनाला तुमच्या मतांबाबत समजले आहे. तुम्हाला त्वरीत सेवेतून मुक्त करण्याची सूचना मला देण्यात आली आहे," असे प्रा. टेलिस यांनी सांगितले. त्यांनी या घटनेबद्दल आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सविस्तर लिहिले आहे. 

माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही. माझ्यासोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, आणि ही शेवटचीही नसेल. परंतु, विद्यार्थ्यांप्रमाणे मी हे निमूटपणे सहन करणार नाही, असेही टेलिस यांनी म्हटले आहे. 

प्रा. टेलिस यांच्या आरोपांबाबत कॉलेजने एका निवेदनात म्हटले आहे की, टेलिस यांना सहा महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आले होते. ते समलैंगिक असल्याचे त्यांनी अर्जामध्ये आणि मुलाखतीवेळी स्पष्टपणे म्हटले होते. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असे मानून कॉलेजने ते स्वीकारले होते. 
 
Web Title: Bengaluru college sacks gay professor