Bengaluru : पिंक सिटी बंगळुरू; फोटो पाहाल तर प्रेमातच पडाल | Bengaluru wears pink again pink trumpets in full bloom trending on social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bengaluru Flowers

पिंक सिटी बंगळुरू; फोटो पाहाल तर प्रेमातच पडाल

बंगळुरू शहर पुन्हा एकदा गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे. बंगळुरूचे रस्ते गुलाबी रंगाने फुलून गेले आहे. हे काही फोटो पाहिलेत तर तुम्हीही या शहराच्या प्रेमात पडाल.

बंगळुरूमधल्या रस्त्यावर सध्या गुलाबी रंगाची सुंदर फुलं उमलली आहेत. सोशल मीडियावरही अनेकांनी या फुलांचे आणि त्यामुळे सुंदर झालेल्या रस्त्यांचे फोटो शेअर केले आहेत आणि या फुलांमुळे वातावरण प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

Bengaluru Flowers

Bengaluru Flowers

या झाडाचे शास्त्रीय नाव टॅब्युबिया रोझिया असं आहे. त्याला हिंदीमध्ये बसंत रानी असं म्हणतात. तर इंग्रजीमध्ये या झाडाला पिंक ट्रम्पेट, पिंक पाऊल या नावांनीही ओळखलं जातं. हे झाड मुख्यतः उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते. या झाडाचं उगमस्थान मेक्सिकोच्या दक्षिण भागामध्ये आहेत.

Bengaluru Flowers

Bengaluru Flowers

ही झाडे साधारणतः शुष्क वातावरणात, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात फुलतात. काही ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, एप्रिल आणि मेमध्येही या फुलांचा बहर दिसून येतो.ही झाडे सुमारे २५ ते ३० फूट उंच वाढतात. या झाडांना दरवर्षी वसंत ऋतूमध्ये बहर येतो.

टॅग्स :flower