काँग्रेसचे आमदार गुजरातमध्ये परतले

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: राज्यसभा निवडणुकीपूर्वी बंगळूरला गेलेले गुजरातमधील काँग्रेसचे सर्व आमदार आज सकाळी येथे परतले. या सर्वांना आणंद जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार आहेत. पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजनैतिक सल्लागारही आहेत. आमदारांनी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश करू नये, यासाठी काँग्रेसचे 44 आमदारांना बंगळूरला पाठवले होते.

काँग्रेसचे मुख्य प्रतोद शैलेश परमार यांनी आणंद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले, की आमचे सर्व आमदार परत आले आहेत आणि आणंदच्या एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. विमानतळावरून सर्व आमदारांना थेट निजाणंद नावाच्या रिसॉर्टमध्ये घेऊन जाण्यात आले.

आमच्या सर्व आमदारांनी राखी पौर्णिमेच्या दिवशीही घरी न जाण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याच निर्णय घेतला आहे. हे सर्व आमदार एकत्र राहतील आणि उद्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी गांधीनगरला जातील, असेही परमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: benglore news congress mla return and gujrat election