Friendship Day : 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे'; नेतान्याहू यांनी दिल्या मोदींना शुभेच्या

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

इस्राईलच्या दूतावासाने ट्विटरवर शुभेच्छा देताना "शोले' चित्रपटातील "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे', अशा ओळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : भारताबरोबर विशेष मैत्रीचे संबंध प्रस्थापित झालेल्या इस्राईलने मैत्रीदिनानिमित्त भारताला शुभेच्छा देताना बॉलिवूडचा आधार घेतला आहे. इस्राईलच्या दूतावासाने ट्विटरवर शुभेच्छा देताना "शोले' चित्रपटातील "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे', अशा ओळीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

तसेच आपली मैत्री आणि भागीदारी नव्या उंचीवर पोचू दे, अशी आशा व्यक्त केली आहे. या शुभेच्छा मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही "हिब्रू'मध्ये प्रतिसाद देत इस्राईलला आणि त्यांचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benjamin Netanyahu wishes Friendship Day to Narendra Modi