भारतात ‘बेटी पढाओ’ प्रगतिपथावर

Girl-Education
Girl-Education

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ७४ टक्के; जगाच्या तुलनेत मात्र मागे
नवी दिल्ली - भारतात मुलींच्या शिक्षणाचा पाया महात्मा जोतीराव फुले यांनी घातला. आता तर मुलांच्या बरोबरीने मुली शिकू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा टक्का ७४ पर्यंत वाढला आहे. १९५० मध्ये ही टक्केवारी १८ टक्के होती.

महिला शिक्षणाने प्रगती 
भारतात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढते असले तरी, जगाचा विचार करता यात मोठी तफावत दिसून येते. भारतात अजूनही अशिक्षित महिलांची संख्या मोठी असल्याने अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. निरक्षरतेमुळे महिला कारखाने, कंपन्यांमध्ये काम करू शकत नाहीत. ही बाब देशाच्या विकासाला मारक ठरते. ‘घरातील एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते’, हे खरे असल्याचे अनेक अभ्यासांतून निदर्शनास आले आहे. 

भावी पिढीच्या शिक्षणात घरातील महिलांचा प्रत्यक्ष संबंध असल्याने त्या स्वतःचा शिक्षित असणे महत्त्वाचे असते. वडिलांपेक्षा आई शिक्षित असणे, हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिणामकारक ठरते, हेही अभ्यासातून पुढे आले आहे. शिक्षित महिलांच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळांची उपज उत्तम असते. म्हणजे त्यांचे वजन योग्य असते व बालमृत्यूचे प्रमाणही कमी असते.

जगाच्या तुलनेत भारत मागे
जगातील अन्य देशांचा विचार करता भारतात महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण हे कमी असून, ते ६० टक्‍के एवढे आहे. हे प्रमाण जगाच्या सर्वसाधारण टक्‍केवारीपेक्षा २२ टक्‍क्‍यांनी कमी आहे. विकसित देशांप्रमाणेच श्रीलंका, झिंबाब्वे आदी मध्यम व कनिष्ठ उत्पन्न गटांतील देशांच्या तुलनेतही भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.

पुरुषांच्या शिक्षणाला महत्त्व
महिला शिक्षणाचे प्रमाण कमी असण्याबरोबच भारतातील शैक्षणिक क्षेत्रातही लिंग असमानता मोठ्या प्रमाणावर आहे. महिला व पुरुषांच्या शिक्षण दरात २० टक्‍क्‍यांचा फरक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रथमच या फरकातील अंतर कमी झाले असले तरी, महिला व पुरुषांच्या शिक्षणातील असमानता कायम आहे. मात्र, तरुण महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे, ही आशादायी बाब आहे. २०११च्या जनगणनेनुसार ७ ते २९ वर्षे वयोगटातील महिलांच्या एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के तरुणी या साक्षर आहेत. ६० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हे प्रमाण ३० टक्‍क्‍यांहून कमी आहे.

भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या केरळमध्ये ७ ते २९ वर्षे वयोगटातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ९८ टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com