‘एक दिवस सिंहासारखे जगणे चांगले’

Board-on-India-and-tibet-border
Board-on-India-and-tibet-border

इटानगर (अरुणाचल प्रदेश) - अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) चौकीवर लावलेला एक फलक सध्‍या चर्चेत आहे. फलकावरील ‘इट इज बेटर टू लिव्ह वन डे ॲज लायन दॅन अ हंड्रेड इयर्स ॲज शिप’ (शंभर दिवस मेंढरांसारखे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगणे चांगले) असा संदेश लिहिला असून सध्याच्या भारत व चीनमधील तणावाच्या काळात या संदेशातून भारतीय जवानांचे शौर्य व साहसी वृत्तीचे दर्शन घडवीत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लडाखच्या सीमेवर काही महिन्यांपूर्वी भारत व चीनमधील सैनिकांमध्ये झडलेल्या चकमकीनंतर अरुणाल प्रदेशमधील सीमेवरही ‘आयटीबीपी’चे जवान कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहेत. अशातच सीमेवरील चौकीवर झळकत असलेल्या फलकावरील संदेश तसा खूप जुना असला तरी तणावाच्या वातावरणात भारतीय जवानांच्या विचारांचे प्रतिबिंब त्यात पडत असल्याने तो लक्षवेधक ठरत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com