अभिनेत्री डिंपल यांची आई बेट्टी कपाडिया यांचे निधन; अंत्यसंस्कारासाठी अक्षय-ट्विंकल उपस्थित

वृत्तसंस्था
रविवार, 1 डिसेंबर 2019

- अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे काल (शनिवार) रात्री निधन

नवी दिल्ली : अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे काल (शनिवार) रात्री निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. बेट्टी कपाडिया या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अभिनेता अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

बेट्टी कपाडिया या रुग्णालयात असताना त्यांची नात अभिनेत्री ट्विंकल खन्ना पती अभिनेता अक्षय कुमारसोबत भेट घेण्यासाठी आले होते. बेट्टी कपाडिया यांना श्वसनाचा विकार जाणवल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात त्यांच्यावर 20 पेक्षा अधिक दिवस उपचार सुरु होते. मात्र, काल त्यांचे निधन झाले.  

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

बेट्टी कपाडिया यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेता आणि खासदार सनी देओल, ऋषी कपूर यांच्यासह अनेक अभिनेते उपस्थित होते. त्यादरम्यानचे फोटोही समोर येत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Betty Kapadia Passes Away Twinkle Khanna And Akshay Kumar Present for Funeral