भगतसिंग यांचे पिस्तूल पंजाबमध्ये आणणार

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

चंडिगड : इंदोरमधील BSF च्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्‍टिक्‍स संग्रहालयात सापडलेले भगतसिंग यांचे पिस्तूल आता पंजाबमधील खतकर कलन येथील शहीद-ए-आझम भगतसिंग संग्रहालयात आणण्यात येणार आहे. त्यांचे भाचे अभयसिंग सांधू यांनी याबाबतची मागणी केली होती.

1969 पर्यंत हे पिस्तूल फिलापूर येथील पंजाब पोलिस ऍकॅडमीत होते. त्यानंतर त्याचा पत्ता लागला नव्हता, अनेक लोकांनी शोध घेऊन पिस्तुलाची बनावट आणि सीरियल नंबरच्या आधारे इंदोरमधील संग्रहालयातील पिस्तूल हेच भगतसिंग यांचे असल्याचे सिद्ध केले. यानंतर भगतसिंग यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार ते आता पंजाबमध्ये आणण्यात येणार आहे.

Web Title: bhagati singh's pistol to return to punjab