सायबर विश्वामध्ये ‘भाई-लॅंग’ची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhai-Lang

सायबर विश्वामध्ये ‘भाई-लॅंग’ची चर्चा

नवी दिल्ली : सध्या सायबर विश्वामध्ये नव्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजची चर्चा सुरू झाली आहे. ‘भाई-लॅंग’ असे या भाषेचे नाव असून ही ‘टॉय प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज’ दोन भारतीय डेव्हलपर्संनी तयार केली आहे. सध्या ‘अमेझॉन’मध्ये कार्यरत असलेले अंकित सिंह आणि ‘ग्रो’मधील ऋषभ त्रिपाठी यांनी हे संशोधन केले आहे. ‘भाई’ हा मूळ हिंदीतील शब्द असून त्याचा अर्थ ‘भाऊ’ असा होतो. टाइप स्क्रिप्टमध्ये ती लिहिण्यात आली असून या लॅंग्वेजच्या नावामध्ये हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण आढळून येते.

‘जावा’ आणि अन्य प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजप्रमाणेच ‘भाई-लॅंग’मध्येही वाक्य रचनेसाठी वेगळे नियम आहेत या नियमांमधील प्रत्येक वाक्यात ‘भाई’ हा शब्द येतोच. या लॅंग्वेजच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, या लॅंग्वेजच्या कोडचा एंट्री पाइंट हा देखील ‘हाय भाई’ असाच असून वाक्याचा शेवट मात्र ‘बाय भाई’ने होतो. या टॅग्जचा वापर करून तयार करण्यात आलेले सगळे कोड हे मान्य केले जातील त्याबाहेरील कोडला मात्र परवानगी नसेल. यामध्येही एखादा डेव्हलपर आणि कोड मेकरने चूक केली असेल तर हा प्रोग्रॅम त्याला थांबवून ‘अरे भाई, भाई, भाई’ अशा शब्दांत समजावेल.

गिट हब पेजची निर्मिती

सध्या सोशल मीडियामध्ये या नव्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचे स्क्रीन शॉट व्हायरल होऊ लागले असून यूजर्संकडून देखील त्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एचटीएमएल, सीएसएस, सी++ आदींप्रमाणे ‘भाई लॅंग’ देखील काम करते. या लॅंग्वेजचे स्वतःचे गिटहब पेज देखील आहे, येथे यूजर्संना सोर्स कोड पाहायला मिळतो. ‘भाई लॅंग’मध्ये प्ले ग्राऊंड देखील आहे. येथे यूजर्स हे नव्या लॅंग्वेजचा वापर करून कोड तयार करू शकतात.

Web Title: Bhai Lang In The Cyber World Toy Programming Language Amazon Groww

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top