कोवॅक्सिनला आणखी एका देशात वापरास परवानगी

 icmr, bharat biotech, vaccine, covaxin, human trials
icmr, bharat biotech, vaccine, covaxin, human trials
Summary

भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) लशीला हंगेरीकडून GMP सर्टिफिकेट देण्यात आले आहे. भारत बायोटेकला एका युरोपीय नियामकांकडून पहिल्यांदाच EUDRAGDMP सर्टिफिकेट मिळालं आहे.

नवी दिल्ली- भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) लशीला हंगेरीकडून GMP सर्टिफिकेट देण्यात आले आहे. भारत बायोटेकला एका युरोपीय नियामकांकडून पहिल्यांदाच EUDRAGDMP सर्टिफिकेट मिळालं आहे. भारत बायोटेक कंपनीने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. कंपनीने मैलाचा टप्पा गाठला आहे. यामुळे लशीची विस्वासार्हता वाढणार असून जगभरातील देशात लशींची निर्मिती करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भारत बायोटकने म्हटलंय. (National latest marathi news)

भारतातील हैदराबाद येथील भारत बायोटेक कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लशीची निर्मिती करत आहे. भारतात या लशीचा वापराला मंजुरी आहे. पण, जागतिक पातळीवर या लशीचा मान्यता मिळाली नाही. कंपनी यासाठी प्रयत्न करत आहे. हंगेरी सरकारने लशींच्या निर्मिती आणि वापराला परवानगी दिल्याने भारत बायोटेकला मोठं यश मिळालं आहे. जगातील इतर देशातही कोवॅक्सिन लशीच्या निर्मितीला आणि आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.

भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या प्रभावीपणाचे रिझल्ट जाहीर केलेत. यात कोरोना विषाणूवर लस 77.8 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलंय. याशिवाय डेल्टा व्हेरियंटविरोधात B.1.617.2 (Delta) लस 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आलाय. भारतात सध्या याच व्हेरियंटचा प्रादुर्भाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून World Health Organization (WHO) भारत बायोटेकला सकारात्मक संकेत मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काळात आरोग्य संघटना कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com