लस उत्पादन कंपनीतच कोरोना, 50 कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोना
कोरोना

कोरोना महामारीच्या (Covid-19 ) दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवलाय. त्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे अनेकांचा जीव जात आहे. कोरोनाची (Covid-19 ) संख्या दिवसभर वाढत चालली असताना देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस निर्मीती करणाऱ्या कंपनीनं उत्पादनात वाढ सुरु केली आहे. मात्र, हैदराबाद येथे असलेल्या भारत बायोटेक (Bharat Biotech) लस निर्मिती कंपनीमध्ये 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला (suchitra ella) यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. (Bharat Biotech’s 50 employees corona positive)

लसीचा पुरवठा आम्ही सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. असं असतानाही काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, हे खूप निराशाजनक आहे. कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांना सुट्टी देण्यात आलं आहे. असं असलं तरीही तरीही आम्ही महामारी आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही 24 तास लसीचं उत्पादन सुरुच ठेवणार आहोत. जय हिंद...! असं ट्विट सुचित्रा इल्ला (suchitra ella) यांनी केलेय.

कोरोना
लसीचा तुटवडा संपणार; भारताच्या मदतीनं लस उत्पादन करण्याचा अमेरिकेचा विचार

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, भारत बायोटेक कंपनी एक मे 2021 पासून राज्यांना लसीचा पुरवठा करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात होणारी लसी निर्मितीमधील 50 टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला 50 टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com