पुण्यातील भारत फोर्ज आणि पॅरामाउंट ग्रुपमध्ये सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharat forge and paramount group

युद्धाचे स्वरूप बदलत असताना अलीकडे हवाई संरक्षण क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. याची प्रचिती एरो इंडियामध्ये होत आहे. त्यात भारत फोर्जने ही सहभाग घेतला आहे.

Memorandum of Understanding : पुण्यातील भारत फोर्ज आणि पॅरामाउंट ग्रुपमध्ये सामंजस्य करार

बंगळूर - संरक्षण उत्पादने आणि तंत्रज्ञान निर्मितीत कार्यरत असलेल्या पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड आणि पॅरामाऊंट ग्रुप या एरोस्पेस व तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टरच्या काही भागांच्या विकास आणि उत्पादन सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यलहांकात सुरू असलेल्या 'एरो इंडिया' या कार्यक्रमात भारत सांमजस्य करारावर भारत फोर्जच्या एरोस्पेस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरु बिस्वाल आणि पॅरामाऊंट ग्रुपचे क्लिफर्ड डेवेल यांनी दोन्ही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.

युद्धाचे स्वरूप बदलत असताना अलीकडे हवाई संरक्षण क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. याची प्रचिती एरो इंडियामध्ये होत आहे. त्यात भारत फोर्जने ही सहभाग घेतला आहे. तर या करारानुसार मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टरसाठी कंपोझिट रोटर ब्लेड्स, मिशन सिस्टम्स आणि स्टोअर्स मॅनेजमेंट सिस्टमच्या विकास आणि उत्पादन सहकार्य केले जाणार आहे.

याबाबत बिस्वाल यांनी सांगितले, 'आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारत आणि जागतिक गरजांसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करणे याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. त्या अनुषंगाने पॅरामाउंटसोबतचा हा सामंजस्य करार आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे.

दरम्यान हे सहकार्य भारतामध्ये रोटरी विंग प्लॅटफॉर्मसाठी कंपोझिट रोटर ब्लेड्स, मिशन सिस्टम्स आणि स्टोअर्स मॅनेजमेंट सिस्टमच्या डिझाइन, विकास आणि निर्मितीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. आगामी काळात हे एक प्रमुख डिझाइन आणि उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल.

'हा सामंजस्य करार 'आत्मनिर्भर भारत' उपक्रम साध्य करण्यात मदत करेल. भारत फोर्जसोबतची आमची जागतिक भागीदारी गेल्या काही वर्षांमध्ये मजबूत होत गेली आहे. तर एरोस्पेस क्षेत्रात आमचे सहकार्य वाढवण्यास आम्ही उत्सुक आहोत. या करारामुळे भारतातील आणि जगभरातील मध्यम लिफ्ट हेलिकॉप्टरसाठी या प्रणालींच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आमच्या संयुक्त क्षमतेच्या समन्वयाचा भारतासह इतर देशांना लाभ घेता येईल.'

- क्लिफर्ड डेवेल, पॅरामाउंट ग्रुप

टॅग्स :punebengaluru