"भारत के वीर'साठी एक कोटीची मदत

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

नवी दिल्ली - नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेल्या निमलष्करी दलाच्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य म्हणून राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ (एनबीसीसी) ने आज एक कोटीचा धनादेश गृहमंत्रालयाला सुपूर्त केला. "भारत के वीर' नावाच्या निधीसाठी हा धनादेश केंद्रीय नागरी विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिला.

भारत के वीर ऍपच्या नावाने मोबाईल ऍप केंद्र सरकारकडून अभिनेता अक्षय कुमार यांच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात आला. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गेल्या
एप्रिलमध्ये जवानांना आर्थिक मदत देण्यासाठी तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन केले होते. एक कोटीचे अर्थसाह्य केल्याबद्धल राजनाथसिंह यांनी वेंकय्या नायडू आणि एनबीसीसीचे आभार मानले. हा ऍप सुरू होताच महिनाभरातच अनेक कोटी रुपये "भारत के वीर' निधीत जमा झाले आहेत. 24 एप्रिल रोजी सुखमा हल्ल्यात 25 जवान हुतात्मा झाले होते. त्यासाठी 60 लाख रुपये "भारत के वीर' निधीत जमा झाले. "भारत के वीर' असे संकेतस्थळ आणि ऍप आहे की त्या माध्यमातून हुतात्मा जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांचा जनधन खात्याचा क्रमांक आणि मोबाईल क्रमांकही उपलब्ध आहे. कोणताही सामान्य भारतीय नागरिक आपल्या इच्छेनुसार जवानाच्या कुटुंबीयांच्या खात्यावर थेट पैशाची मदत करू शकतो. संकेतस्थळावर हुतात्मा झालेल्या जवानाने केलेल्या कामगिरीची माहितीही दिली आहे.

Web Title: bharat ke veer india news marathi news