भारत पेट्रोलियमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या अन् मिळवा फ्री पेट्रोल

या संदर्भात भारत पेट्रोलियमने ट्वीट करत माहिती दिली.
Bharat Petroleum
Bharat Petroleumसकाळ

सध्या देशात इंधन दरांनी (Fuel Price) महागाईचा उच्चांक गाठला आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दराने गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाप बसलाय. त्यामुळे प्रत्येक जण इ्ंधन बचत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसताहेत.

अशातच भारत पेट्रोलियमने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एका स्पर्धेतून बक्षिस जिंकावं लागणार आहे. या संदर्भात भारत पेट्रोलियमने ट्वीट करत माहिती दिली.

Bharat Petroleum
सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

भारत पेट्रोलियमने चार पर्यायासोबत एका प्रश्नाचा फोटो शेअर करत ट्वीट केले “इंधन बचत करण्यासाठी इंधन अर्थव्यवस्थापण मजबूत असायला हवी. पण तुमच्या वाहनाची इंधन अर्थव्यवस्था कशी सुधारायची हे तुम्हाला माहीत आहे का? 1000/- किमतीचे व्हाउचर जिंकण्यासाठी तुमचे उत्तर शेअर करा." सोबतच हि स्पर्धा उत्तीर्ण होण्यासाठी तीन मित्रांना टॅग करा उत्तर द्या आणि #BharatPetroleum हा हॅशटॅग वापरा, असे सुद्धा सांगितले.

Bharat Petroleum
वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही; सरकार देणार मासिक पेन्शन

सध्या हे ट्वीट सोशल मीडिया वर व्हायरल होत असून लोक या ट्वीट ला प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी उत्तरे सुद्धा दिली आहेत.वाढत्या पेट्रोल दरवाढीतून दिलासा मिळवायचा असेल तर भारत पेट्रोलियमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या आणि फ्री पेट्रोल मिळवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com