BharatBandh : भारतबंदला देशभरातून प्रतिसाद

bharat bandh
bharat bandh

नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे. 

अनेक विरोधी पक्ष सहभागी 
इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने पुकारलेल्या "भारत बंद'मध्ये देशभरातील अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन आणि डाव्या नेत्यांनी जाहीरपणे बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

राज्यभरातील बंद संदर्भातील लाईव्ह अपडेट
मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने मुंबईत रेल रोको आंदोलन केले. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
नगर : नगर जिल्ह्यात भारत बंदला मोठा प्रतिसाद, सर्वत्र कडकडीत बंद, ग्रामीण भागातही प्रतिसाद, शिर्डीत मात्र संमिश्र प्रतिसाद.
नांदेड : काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये स्कुल बस, मॅजिक व्हॅन, ऑटो रिक्षासह नांदेड शहरातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्कूल बस, व्हॅन येणार नसल्याने पालकांनी मुलांना शाळेत आणत होते.
नाशिक : शहर बससेवा बंद, शाळांना सुट्टी नसली तरी विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती.
सोलापूर : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पेट्रोल पंपावर कडेकोट पोलीस बंदोबस्त.
जळगाव : जळगावातील जामनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर; बंदला व्यापाऱ्यांचाही पाठिंबा, जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद.
कल्याण : कल्याणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी; पश्चिमेकडील शिवाजी चौकात आंदोलन, मनसेचाही सहभाग.
अंधेरी : अंधेरीत डीएन नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली.
डोंबिवली : डोंबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियनकडून रिक्षा बंद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com