भटनागर 'सीआरपीएफ'चे महासंचालक

पीटीआय
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नवी दिल्ली: छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर (सीआरपीएफ) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, आता "सीआरपीएफ'च्या महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर. आर. भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जवानांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर भटनागर यांनी लोधी रोड येथील "सीआरपीएफ'चे मुख्यालय गाठत अधिकृत पदभार स्वीकारला. उत्तर प्रदेश केडरचे 1983 च्या बॅचचे अधिकारी असणारे भटनागर हे आता "सीआरपीएफ'चे पूर्णवेळ महासंचालक असतील. महासंचालक के. दुर्गा प्रसाद हे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिकामेच होते. हंगामी महासंचालक सुदीप लखटिया यांनी आज भटनागर यांच्याकडे महासंचालकपदाची सूत्रे सोपविली. भटनागर यांच्याकडे आतापर्यंत "अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो'च्या महासंचालकपदाची सूत्रे होती. महासंचालक म्हणून भटनागर यांच्याकडे 32 महिन्यांचा कार्यकाळ असेल.

छत्तीसगड हल्ल्याचा घेतला आढावा
महासंचालकपदाची सूत्रे स्वीकारताच भटनागर यांनी छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याची माहिती घेतली, या बैठकीस अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते. देशातील सर्वांत मोठे निमलष्करी दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "सीआरपीएफ'च्या बहुतांश जवानांना नक्षलप्रभावित भागामध्ये तैनात करण्यात येते. भविष्यामध्ये "सीआरपीएफ'च्या नक्षलविरोधी मोहिमेस आणखी वेग येऊ शकतो.

Web Title: Bhatnagar is CRPF Director General