भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर कन्येकडून अंत्यसंस्कार
इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भय्यू महाराजांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला.
भय्यू महाराज यांनी मंगळवारी (ता. 12) इंदूरमधल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कारापूर्वी सजवलेल्या रथातून भय्यूजी महाराज यांची अंत्ययात्रा सूर्योदय आश्रमातून मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. आश्रम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी हजारो भक्तगण उपस्थित होते.

दरम्यान, भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. आत्महत्या कुटुंब कलह व आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.