भीम आर्मीच्या आझाद यांचं CM योंगीना थेट आव्हान!

Up Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत रंगत भरायला सुरवात झाली आहे.
Chief Chandrashekhar Azad
Chief Chandrashekhar Azadsakal media

Up Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत रंगत भरायला सुरवात झाली आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीबाबात मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या मतदारसंघात उभे राहतील तिथुन लढणार असल्याचे आझाद यांनी घोषित केलं आहे. ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला बोलत होते.

Chief Chandrashekhar Azad
राफेल प्रकरणाची चौकशी न करण्याचा CBIचा निर्णय - रिपोर्ट

चंद्रशेखर आझाद म्हणाले, ''त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढणार आहे. मी निवडणुक लढावी की नाही हा निर्णय पक्षाचा आहे. सध्या लोकशाही असून, माझ्या पक्षात मला बोलण्याचा अधिकार आहे. पक्षाने मला लढण्याची संधी दिली तर जिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभे राहतील, त्या मतदारसंघात मी उभा राहील."

मागील साडेचार वर्षात उत्तर प्रदेशातील नागरिकांना आदित्यनाथ यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुध्द निवडणुक लढुन त्यांना सत्तेत आणि विधानसभेत येऊ न देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Chief Chandrashekhar Azad
महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांविरोधात उभे न राहिल्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. गेल्यावेळी आमचा कोणताही पक्ष नव्हता. म्हटलं जायचे, पंतप्रधान माझ्याविरुध्द निवडून येतील. तेव्हा मी नाही लढलो. परंतु, यंदा पक्षाने संधी दिली तर मी लढणार. माझे विधानसभेत जाणे नाही तर योगींना पराभुत करणे महत्वाचे आहे, असेही आझाद म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com