सहारणपूरमधील तणावामागे 'भीम आर्मी'चा हात

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

सहारणपूर: उत्तर प्रदेशातील सहारणपूर जिल्ह्यात मंगळवारी भडकलेल्या जातीय दंगलीमागे "भीम आर्मी' या संघटनेचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. या संघटनेचे नेतृत्व वकील चंद्रशेखर हे करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शब्बीरपूर गावात ठाकूर समुदायाकडून महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीस संबंधित संघटनेने विरोध दर्शविल्यानंतर दोन गटांत वादाची ठिणगी पडली. परिणामी राजपूतांकडून काही दलित घरांची जाळपोळ झाल्यानंतर संतप्त जमावाने एक पोलिस ठाणे पेटवून दिले होते. या संघर्षात जवळपास वीस वाहने भस्मसात झाली, तसेच अनेकजण जखमीही झाले आहेत.

या घटनेनंतर "भीम आर्मी'कडून बोलावण्यात आलेल्या महापंचायतीला परवानगी नाकारल्यानंतर निदर्शने सुरू झाली असून, संघटनेकडून सोशल मीडियाद्वारे दलितांना चेतवण्याचे काम सुरू आहे. या निदर्शनांदरम्यान दगडफेकीचे प्रकारही घडले. तर काही पत्रकारांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आले. त्यामुळे पत्रकार संघटनांनी याचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आसपासच्या भागांतही तणाव
या घटनेचे लोण आसपासच्या रामनगर, नझिरपुरा, हलालपुर आणि माल्हीपूर या भागातही पसरले आहे. येथे विविध ठिकाणी रास्ता रोको, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. जमावाने रामपूरमधील पोलिस ठाणे, एक बस व काही दुचाकींना आगी लावल्या. यात काहीजण जखमी झाले आहेत.

Web Title: The Bhim Army hand behind tension in Saharanpur