एल्गार परिषद-कोरेगाव भीमा प्रकरणः नवलखा, तेलतुंबडेंसह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

गौतम नवलखा यांनी याचवर्षी एप्रिल महिन्यात एनआयएसमोर आत्मसमर्पण केले होते. ​

नवी दिल्ली- एल्गार परिषद-कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, स्टॅन स्वामी, माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनीबाबू, गोवा येथील व्यवस्थापन संस्थेचे प्रा. आनंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गाईचोर आणि त्यांची पत्नी ज्योती जगताप यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

इतर आरोपींशी संगनमत करुन भाकप-माओवाद्यांची विचारसरणी पुढे नेण्यासाठी कट रचल्याचे सुमारे 10 हजार पानांच्या आरोपपत्रात म्हटले  आहे. 

गौतम नवलखा यांनी याचवर्षी एप्रिल महिन्यात एनआयएसमोर आत्मसमर्पण केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. त्यांना 2018 मध्ये कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभागी असल्याच्या कारणावरुन बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायद्यांतर्गत आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, एनआयएने मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी (दि.8) अटक केली. 83 वर्षीय स्टॅन स्वामी यांना चौकशीनंतर रांची येथून अटक केली. यापूर्वी स्वामी यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima Koregaon case NIA files chargesheet against 8 persons including Anand Teltumbde Gautam Navlakha Hany Babu