
खून केल्यानंतर आरोपी पोलीस मृतदेह खोलीत बंद करून फरार झाला.
Crime News : पोलिसाचं घृणास्पद कृत्य; भांडणानंतर पत्नीला रॉकेल ओतून दिलं पेटवून
भोजपूर : बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातून (Bihar Bhojpur) खुनाची खळबळजनक घटना समोर आलीय. इथं एका होमगार्ड जवानानं पत्नीला जिवंत जाळलंय. हत्येची ही गंभीर घटना बधरा येथील सिन्हा ओपी भागातील मौजमपूर गावात घडली.
अमर सिंह असं आरोपी होमगार्ड जवानाचं नाव असून तो सध्या बक्सर जिल्ह्यात तैनात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड जवानाचं (Police) पत्नी रूपादेवीसोबत अनेकदा भांडण होत होतं. रूपादेवीच्या मुलांनी सांगितलं की, वडील नेहमी आईला जीवे मारण्याची धमकी देत होते. मयत रूपादेवीची सर्व मुलं सकाळी शाळेत गेली असताना तिच्या पतीनं रूपासोबत वाद घालत तिला बेदम मारहाण केली. यावरही न थांबता त्यानं रूपादेवीवर रॉकेल शिंपडून तिला जाळून ठार केलं. खून केल्यानंतर आरोपी पोलीस मृतदेह खोलीत बंद करून फरार झाला.
दुपारी त्यांची मुलं शाळेतून घरी परतली असता, त्यांना घराच्या आतील खोलीच्या दरवाजाला कुलूप लावलेलं दिसलं. मुलांनी आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नानंतर खोलीचा दरवाजा तोडला आणि मृतदेह पाहून तात्काळ सिन्हा ओपी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि आरोपी होमगार्ड जवानाला अटक केली.