अभिनेता रवि किशनचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

रवि किशन यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जौनपुर येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नवी दिल्ली - प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवि किशनने आज (रविवार) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रवि किशन यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यावेळी उपस्थित होते. तिवारी यांनी यापूर्वीच रवि किशन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे ट्विटवरद्वारे जाहीर केले होते.

रवि किशन यांनी अनेक भोजपुरी व बॉलिवूडमधील चित्रपटांत भूमिका साकारलेल्या आहेत. रवि किशन यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जौनपुर येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Web Title: bhojpuri actor ravi kishan joins bjp