Video: ढसाढसा रडताना अभिनेत्री म्हणाली, मोदीजी मदत करा...

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे.

भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण सांगितले आहे. शिवाय, मदतीसाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची गळ घातली आहे.

नेहा म्हणाली, 'मला पतीने सोडले, त्याने मला मारहाण केली. माझ्या पतीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. मला आई-वडील नाहीत. विवाहासाठी मी माझ्याकडची सर्व संपत्ती विकली. पण, पतीने कधीही मला त्याच्या घरी नेले नाही. त्याने माझी फसवणूक केली आहे, त्याने मला मारहाण केली. तो अमेरिकन नागरिक आहे. मोदी व भारतीय कायदा माझे काहीही बिघडवू शकत नाही, असे तो आता म्हणतोय. गेल्या तीन दिवसांपासून उपाशापोटी मी पोलिस ठाण्यांच्या पायऱया झिजवतेय. मोदीजी प्लीज मदत करा. माझा पती मला सोडून अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहे. तो अमेरिकेत पळाला तर माझ्याजवळ मरण पत्करण्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग उरणार नाही. त्यामुळे मोदीजी, कृपा करून माझ्या पतीला अमेरिकेत जाण्यापासून थांबवा.'

https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/2/2019/10/13130856/neha-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720 नेहाचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. नेहाने आई-वडिल नसल्यामुळे स्वत: लग्नाचा खर्च केला. यासाठी संपत्ती विकली. पण, विवाह झाल्यानंतर पतीने जबाबदारी स्वीकारली नाही. दरम्यान, एका मुलाखतीत नेहाने सांगितल्यानुसार, एका संकेतस्थळाच्या माध्यमातून नेहा व विजय एकमेकांच्या संपर्कात आले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Bansal (@neha.bansal.589) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Bansal (@neha.bansal.589) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhojpuri actress neha bansal shared video facebook seeking help pm narendra modi