#BhookampAaneWalaHai राहुल गांधींच्या भुकंपाने उडवली हास्याची कारंजी!

शुक्रवार, 20 जुलै 2018

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी 'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल' असे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य आज लोकसभेतील अविश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सोशल मीडियावर गाजत आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी 'मला पंधरा मिनिटे बोलू दिले, तर भूकंप होईल' असे वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य आज लोकसभेतील अविश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सोशल मीडियावर गाजत आहे. #BhookampAaneWalaHai हा ट्रेंड ट्विटरवरव व्हायरल होतोय, तर या वक्तव्यामुळे राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. 

भाजपचे खासदार परेश रावल यांनीही 'राहुलजी, आज तुम्ही कुठलाही कागद न धरता भाषण करून दाखवा; नक्कीच धरणीकंप होईल', अशा शब्दांत राहुल गांधींच्या भाषणाची खिल्ली उडविली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रावल म्हणाले, "जर राहुल गांधी यांनी आज कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कुठलीही गडबड न करता, कुठलीही चूक न करता सलग 15 मिनिटे भाषण केले, तर खरंच धरणीकंप होईल. नुसताच धरणीकंप नव्हे, तर जमीन नाचूही लागेल.''  

#BhookampAaneWalaHai हॅशटॅगवर व्हायरल झालेले विनोद - 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: BhookampAaneWalaHai viral on social media