esakal | भाजप खासदाराला फोनवरून धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

राम मंदिरच्या निर्मितीवरून वक्तव्ये

भाजप खासदाराला फोनवरून धमकी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना अज्ञात फोनवरून धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने राम मंदिर भूमिपूजनसह इतर काही मुद्यांवर वक्तव्ये केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कमलानगर ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यापूर्वीही प्रज्ञासिंह ठाकूर यांना एक बंद पाकिट मिळाले होते. जेव्हा हे बंद पाकिट उघडण्यात आले तेव्हा त्यातून पांढऱ्या रंगाच्या पावडरचे एक पॅकेट आणि चिट्ठी मिळाली होती. त्या चिट्ठीत प्रज्ञासिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली. 

विविध वक्तव्यांनी चर्चेत

प्रज्ञासिंह ठाकूर आपल्या विविध वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक वक्तव्ये केली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या, 25 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता घरी हनुमान चालीसाचे पाचवेळा वाचन करा, असे केल्यास कोरोना नष्ट होईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपला घेरलेही होते. 

राम मंदिरच्या निर्मितीवरून वक्तव्ये

राम मंदिर निर्मितीच्या मुद्द्यावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना धमकी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांबाबतही अपशब्द वापरले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2019 मध्ये खासदार

प्रज्ञासिंह ठाकूर या 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. त्यानंतर 21 नोव्हेंबर, 2019 मध्ये प्रज्ञासिंह ठाकूर या संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवर होत्या. मात्र, नथुराम गोडसे हे देशभक्त असल्याचे त्यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

loading image