पाच-दहा नव्हे, 50 वर्षांसाठी सत्तेत आलोय: अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

एकही जागा सुटू नये
भाजपच्या अनेक निष्ठावान नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची उभारणी आणि त्याला सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले आहे. यामुळेच आज पक्षाचे 10 ते 12 कोटी सदस्य आहेत. असे अमित शहा यांनी निदर्शनास आणून दिले.'' देशातील एकही ठिकाण असे राहता कामा नये, की जेथे पक्षाचा ध्वज नसेल.'' यासाठी पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही शहा म्हणाले.

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत त्याचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करावा, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज केले.

मध्य प्रदेशमधील भाजपनेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या वेळी शहा बोलत होते. ते म्हणाले, ""केंद्रात भाजपचे स्वःबळावर निवडून आलेले सरकार असून, 330 खासदारांसह विविध राज्यांतील सुमारे 1 हजार 387 आमदार पक्षाच्या पाठिशी आहेत. मात्र, तरीही पक्षाला अजून मोठा टप्पा गाठायचा असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आगामी 40-50 वर्षांत सत्तेच्या माध्यमातून देशाचा कायापालट करण्याचा निर्धार करत पुढे वाटचाल करणे महत्त्वाचे आहे.''

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अमित शहा 110 दिवसांत देशाचा दौरा करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून ते सध्या मध्य प्रदेशच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

एकही जागा सुटू नये
भाजपच्या अनेक निष्ठावान नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची उभारणी आणि त्याला सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले आहे. यामुळेच आज पक्षाचे 10 ते 12 कोटी सदस्य आहेत. असे अमित शहा यांनी निदर्शनास आणून दिले.'' देशातील एकही ठिकाण असे राहता कामा नये, की जेथे पक्षाचा ध्वज नसेल.'' यासाठी पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही शहा म्हणाले.

Web Title: bhopal news bjp amit shah and politics