हल्ल्यात भोपाळच्या विवाहितेला ११८ जखमा

छेड काढताच श्रीमुखात लगावली : बलात्कारासही प्रतिकार केला
Injured Women
Injured WomenSakal

भोपाळ - हॉटेलच्या पार्किंगमधील वादातून आधी छेड काढलेल्या आणि नंतर बलात्काराचा प्रयत्न केलेल्या नराधमांना एका विवाहीत महिलेने श्रीमुखात लगावून जोरदार प्रतिकार केला. काही वेळाने या नराधमांनी या महिलेवर पेपर कटरने हल्ला केला. त्यात महिलेच्या चेहऱ्यावर ११८ टाके घालावे लागले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील टीटी नगरमधील रोशनपुरा परिसरात हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. ही महिला पतीसह श्री पॅलेस हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी दुचाकी पार्क करण्यावरून तीन जणांनी त्यांचा वाद झाला. नंतर पती हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी त्रिकुटने तिची छेड काढली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने त्यातील एकाच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर ती हॉटेलमध्ये गेली. काही वेळाने पतीसह ती बाहेर येताच या त्रिकुटाने तिच्यावर हल्ला केला. त्यात महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. नंतर पतीने तिला रुग्णालयात दाखल केले.

दोन जणांना अटक

पोलिसांनी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तातडीने तपास केला आणि दोन जणांना अटक केली. बादशाह बेग आणि अजय ऊर्फ बिट्टी सिब्दे अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी सकाळी या महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. वैद्यकीय उपचारासाठी पूर्ण मदतीची ग्वाही त्यांनी दिली. या धाडसी महिलेला त्यांनी एक लाख रुपयांचे बक्षिसही दिले. या महिलेने आदर्श उदाहरण निर्माण केल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com