भुवनेश्वरमध्ये युवकाने केला तृतीयपंथीयाशी विवाह!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

भुवनेश्वर (ओडिशा)- येथील एका युवकाने तृतीयपंथीयाशी विवाह केला असून, विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

बसुदेव नायक या युवकाने मेघना या तृतीयपंथीयाशी हिंदू परंपरेनुसार विवाह केला. नयापल्ली भागातील दुर्गा मंडपात हा विवाह झाला. विवाह सोहळ्यावेळी प्रसारमाध्यमांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भुवनेश्वरचे महापौर अनंत नारायण जेना यावेळी उपस्थित होते.

बसुदेव यांचा पहिला विवाह झाला होता. त्याला चार वर्षांचा मुलगाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना कायदेशीर अधिकार मिळाले आहेत. दरम्यान, बसुदेवच्या विवाहाची परिसरात चर्चा आहे.

Web Title: Bhubaneswar youth married transgender