धक्कादायक! देशी दारू पाजवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नराधमांना अटक I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Crime News

ती मित्रांसोबत शेतात गेली होती. तिथं आरोपींनी तिला जबरदस्तीनं दारू पाजली.

धक्कादायक! देशी दारू पाजवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

गुजरातमधील (Gujarat) कच्छ जिल्ह्यातील (Kutch) भुज शहराच्या हद्दीत 17 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर जबरदस्तीनं सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. पोलिसांनी (Police) रविवारी या घटनेची माहिती दिलीय. कच्छ पश्चिमचे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह (Police Saurabh Singh) यांनी सांगितलं की, 16 मार्च रोजी भुजिया भागातील एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या शेतात घडलेल्या घटनेप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय. पीडिता बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली आणि जवळच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: भाजपला मतदान करणं पडलं महागात; मुस्लिम महिलेला घराबाहेर हाकललं

एसपींनी सांगितलं की, ती मित्रांसोबत शेतात गेली होती. तिथं आरोपींनी तिला जबरदस्तीनं दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, तक्रारीनंतर चार जणांना अटक करण्यात आलीय. एका व्यक्तीनं तिच्यावर बलात्कार केल्याचं पीडितेला आठवतं. यानंतर दारूच्या नशेत ती बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या आरोपीनं तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली दिलीय. पीडितेवर बेशुद्ध पडल्यानंतर अन्य दोन आरोपींनीही बलात्कार केला का? याचा तपास सुरूय.

हेही वाचा: Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंह राज्यसभेवर जाणार!

वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत

भुज बी डिव्हिजन पोलिसांनी चार आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 366, 328, 376,114 नुसार गुन्हा दाखल केलाय. तसंच पॉक्सोच्या POCSO कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, एकापेक्षा जास्त जणांनी पीडितेवर बलात्कार केला आहे आणि हे शोधण्यासाठी पीडितेच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. हुसेन काकल, राहुल सथवारा, वलजी वधियारा आणि महेश माहेश्वरी अशी आरोपींची नावं असून या सर्वांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

Web Title: Bhuj Gang Rape With Minor After Drinking Country Made Liquor In Kutch Gujarat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GujaratCrime News