छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भूपेश बाघेल

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भूपेश बाघेल यांची आज (रविवार) निवड करण्यात आली. बाघेल यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे प्रभारी पीएल पुनिया, निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

भूपेश बाघेल हे छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्रिपदाबाबतची घोषणा करण्यात आली. त्यात पक्षनेतृत्वाकडून बाघेल यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली मात्र, उद्या (सोमवार) त्यांचा शपथविधी होणार आहे.

दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या रमणसिंह सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यात कॉंग्रेसच्या चार नेत्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामध्ये भूपेश बाघेल, टी. एन. सिंह देव, ताम्रदाज साहू आणि चरणदास महंत यांचा समावेश आहे.

Web Title: Bhupesh Baghel elected as Chhattisgarh Chief Minister