अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव; वृद्धही रांगेत...

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जानेवारी 2020

एका अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव सुरू करण्यात आल्यानंतर बोली लावण्यासाठी युवकांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांनी रांग लावली होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील अहमदगढ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

लखनौ : एका अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव सुरू करण्यात आल्यानंतर बोली लावण्यासाठी युवकांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांनी रांग लावली होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील अहमदगढ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

अल्पयीन मुलीचा लिलाव होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Video: विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव होत असताना मुलगी सतत रडत होती. लिलावावेळी बोली लावणाऱ्यांचा नंबर येत असताना ती व्यक्ती मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. ज्या व्यक्तीचा नंबर यायचा तो रक्कम सांगायचा आणि मुलीशी बोलायचा. सुरुवातीला तिला याची कल्पना नव्हती पण जेव्हा आपली विक्री होत असल्याचे समजले तेव्हा ती रडायला लागली. रडून-रडून मुलीचे डोळे लाल झाले होते. शिवाय, ती विनवणी करत होती. पण, तिच्या दुखाःकडे लक्ष देण्याऐवजी लगट करण्याचा प्रयत्न होत होता. पोलिसांना याबाबतची माहिती समजल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी लिलावावेळी जमा झालेल्या 12 हजार रुपयांसह 7 जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला महिला सेलच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे.

Bulandshahr bid for 16 year old girl, नाबालिग बच्ची के लिए 80 साल के बूढ़ों ने लगाई बोली, पुलिस ने बचाई लड़की की जिंदगी

अहमदगढ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांचीत राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या आईचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मुलीच्या सावत्र आईने एका कलावती नावाच्या महिलेला 50 हजार रुपयांना विकले. कलावती नौरंगाबाद गावात आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा लिलाव होणार असल्याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी लिलावासाठी चौकात गर्दी केली. यामध्ये 20 वर्षांच्या युवकांपासून ते 80 वर्षांपर्यंतच्या वृद्धांचा समावेश होता. एका व्यक्तीने सर्वाधिक 80 हजार रुपये बोली लावली. यावेळीच पोलिस दाखळ झाले. पोलिसांनी कलावती, राजेश देवी, धीरेंद्र, जितेंद्र, इंद्र सिंह, महेंद्र यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...

दरम्यान, पोलिसांनी लिलाव करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर हसू पसरले. झारखंडमधील वेगवेगळ्या भागातील मुली 30-50 हजार रुपयांत खरेदी करून, त्या येथे एक लाख रुपयांपर्यंत विकल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bid for minor girl and police save girls life at up