बिहार : सरकारी शाळेची भिंत कोसळली; भीषण दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू

bihar news
bihar news

बिहारच्या खगडिया जिल्ह्यात सरकारी शाळेची भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १० पेक्षा अधिक लोक दबल्याचं सांगण्यात येत आहे. यांपैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक लोकांनी बचाव कार्य सुरु केलं. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.

ही घटना खगडिया जिल्ह्यातील गोगरी जवळील एका सरकारी शाळेच्या इमारतीजवळ सुरु असलेल्या नाल्याच्या खोदकामावेळी घडली. जेसीबीने खोदकाम सुरु असताना बाजूची माती मोकळी झाल्याने शाळेची इमारतीची एक भिंत कोसळली. या भिंतीजवळ काही लोक बसले होते या लोकांच्या अंगावर ही भिंत कोसळली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. 

नाल्याचं बांधकाम सुरु असताना मजुरांनी गमावला जीव
स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या दुःखदायक घटनेत ज्या लोकांनी आपला जीव गमावला ते सर्वजण मजूर होते. हे सर्वजण नाल्याचं काम करत होते. अद्यापही तीन जण या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. खोदकामावेळी निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com