'बिग बाजारचा बिग बॉस आपला पंतप्रधान'

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

पाटणा (बिहार) - 'बिग बाजारचा बिग बॉस आपला पंतप्रधान आहे', अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत बोलताना केली आहे.

पाटणा (बिहार) - 'बिग बाजारचा बिग बॉस आपला पंतप्रधान आहे', अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत बोलताना केली आहे.

बॅनर्जी म्हणाल्या, "बिग बाजार किती ठिकाणी आहे? बिग बाजार नसलेल्या परिसरात कॅश कशी मिळणार? बिग बाजारचा बिग बॉस आपला पंतप्रधान आहे. त्यांनी सहकारी बॅंका बंद केल्या आणि बिग बाजार मोठ्या बॅंकेत बदलले. ते म्हणत आहेत की भारतातील 86 टक्के जनतेकडे काळा पैसा आहे. लहान मुले "पेटीएम' ऐवजी "पेपीएम' असे म्हणत आहे. ते "अच्छे दिनां'बद्दल बोलतात मात्र त्यांनी "बुरे' दिन आणले आहेत. ते म्हणत आहेत की भारतातील 86 टक्के लोकांकडे काळा पैसा आहे. तसेच ते भारतातील गरीब लोकांना त्यांनी कष्टाने मिळविलेल्या पैशापासून दूर ठेवत आहेत. देशातील नागरिकांच्या भविष्यासाठी आम्ही आमचा निषेध सुरूच ठेवणार आहोत', असेही बॅनर्जी पुढे म्हणाल्या.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखीच्या टंचाईमुळे परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट असल्याची म्हणत "ही आर्थिक आणीबाणी आहे.... महिलांची क्षमता आणि त्यांच्या संपत्तीचा हा अपमान आहे', अशी टीकाही बॅनर्जी यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये बॅनर्जी यांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Big boss of Big Bazaar has become our PM