कांद्याचे दर येणार आटोक्यात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
रविवार, 1 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कांद्यांच्या भावामुळे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तुर्कस्तान आणि इजिप्तमधून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय धातू व खनिज व्यापार महामंडळाने तुर्कस्तानवरून 11 हजार मेट्रिक टन तर इजिप्तवरून 6 हजार 90 मेट्रिक टन कांदा मागवला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महामंडळाने मागवलेला कांदा तुर्कस्तानातून डिसेंबरच्या अखेरीस भारतात पोहोचेल. तर, इजिप्तारून मागवलेला कांदा हा डिसेंबर महिन्याच्या मध्यात पोहोचण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा 

दरम्यान, गुरुवारी दिल्ली सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री इम्रान हुसेन यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून विनंती केली होती की नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाला (नाफेड) जनहित लक्षात घेता दिल्लीतील जनतेला 15 रुपये 60 पैसे प्रति किलो दराने कांद्याचा पुरवठा सुरू ठेवण्यात यावा. दिल्ली सह उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर कमी व्हावा यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 नोव्हेंबरला . 1.2 लाख मेट्रिक टन कांद्याच्या आयात करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर इजिप्त आणि तुर्कस्तानातून कांदा मागवला असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.

धक्कादायक : चक्क हेल्मेट घालून कांदा विक्री; कांद्यासाठी आधारकार्ड तारण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big decision of the central government Onion prices will come under control

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: