
सर्वांनी परस्पर सामंजस्यानं देशाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं. बंधुभावानं जगण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
Maulana Madani : 'अल्लाह-ओम' एक म्हणणाऱ्या मदनींचं पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही एकाच आई-बापाची..
दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'अल्लाह (Allah) आणि ओम' (Om) एकच आहे असं म्हणणारे जमियत उलेमा-ए-हिंदचे (Jamiat Ulema-e-Hind) अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी (Maulana Arshad Madani) यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलंय.
आपण सर्व एका आई-बापाची मुलं आहोत. धर्माच्या भींती तोडून आपण परस्पर सौहार्दानं जगलं पाहिजे, यामुळं देशाच्या प्रगतीला मदत होईल, असं मदनींनी म्हटलंय.
देवबंदच्या भायला गावात कर्नल राजीव यांच्या निवासस्थानी होळी मिलन कार्यक्रमात (Holi Milan Program) त्यांनी हे वक्तव्य केलं. मौलाना मदनी म्हणाले, 'आमचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. यामध्ये आम्ही प्रत्येक गावात प्रेमानं जगत आलो आहोत. आज जे लोक सांप्रदायिकतेच्या वाटेनं आपसात द्वेष पसरवत आहेत, त्यांना आपण पुढं येऊन विरोध केला पाहिजे.'
मदनी पुढं म्हणाले, सर्वांनी परस्पर सामंजस्यानं देशाच्या प्रगतीसाठी सहकार्य करावं. बंधुभावानं जगण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. कार्यक्रमाचे आयोजक कर्नल राजीव म्हणाले, दोन समुदायांमध्ये पसरलेला द्वेष एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊनच संपुष्टात येऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.