Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात मोठी अपडेट; 1 जूनपासून कोर्टात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात मोठी अपडेट; 1 जूनपासून कोर्टात...

नवी दिल्लीः लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर हिची आफताब पूनावाला याने हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता.

श्रद्धा हत्या प्रकरणाध्ये आता आफताब पूनावाला याच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. येत्या १ तारखेपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. खून करुन पुरावे नष्ट केल्याच्या गंभीर आरोपाखाली आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये उघड झालेल्या दिल्लीतल्या घटनेने खळबळ उडाली होती. आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. मात्र लग्नासाठी श्रद्धाने तगादा लावल्याने आफताबने तिचा गळा दाबून खून केला.

खून केल्यानंतर आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. ते तुकडे साठवण्यासाठी त्याने एक फ्रिजदेखील खरेदी केला होता. यथावकाश तो ते तुकडे महरौलीच्या जंगलात फेकायचा. साधारण सहा महिन्यांनंतर हे प्रकरण उघड झालं होतं.

या घनटेने देशात खळबळ उडाली होती. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करुन आम्हांला न्याय द्यावा, अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचं विकास वालकर यांनी सांगितलं.

आफताब प्रकरणात दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारी रोजी ६ हजार ६२९ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. आफताबवरचे आरोप निश्चित झाले असून १ जूनपासून याप्रकरणाची सुनावणी सुरु होईल. संपूर्ण देशाचं लक्ष श्रद्धा खून प्रकरणावर लागलेलं आहे.

टॅग्स :crimemurderdelhi