बिगबास्केटच्या डिलिव्हरी बॉयचा 'तो' फोटो व्हायरल 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली - ऑनलाईन किराणा खरेदी करण्याऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे. घरपोच सेवा मिळत असल्याने अनेकजण विविध साईट्सवरुन किराणा मागवतात. परंतु, हा किराणा आपल्या घरी पोचवणारे कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतात हे निदर्शनास आणण्यासाठी सौरभ त्रिवेदी यांनी बिगबास्केट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा फोटो सोशल मिडियावर टाकला होता. ''प्राण्यांनाही अशी वागणूक मिळू नये'', अशी त्यांनी फोटोला कॅप्शन दिली होती. यानंतर हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. आणि कंपनीला याबाबत उत्तर देण्याची वेळ आली.

सौरभ यांनी हा फोटो टाकताना बिगबास्केट कंपनीला तसेच कामगार व रोजगार मंत्र्यालयाचे रवी शंकर प्रसाद यांना टॅग केले होते. यावर कंपनीने उत्तर देत, डिलिव्हरी बॉईजना उचलाव्या लागणाऱ्या वजनाबाबत तसेच त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आम्ही सजग असल्याचे म्हटले आहे. तसेच सोशलमिडियावर तुम्ही व्यक्त केलेल्या रागाबद्दल आम्हाला दु:ख असल्याचेही कंपनीने म्हटले. याशिवाय, आम्ही 15 किलो पेक्षा जास्त वजन कोणत्याही डिलिव्हरी बॉयकडे देत नाही. कंपनी अंतर्गत वापरल्या जाण्याऱ्या सॉफ्टवेअरमध्ये तशी सोय करण्यात आली आहे. परंतु, हा किराणा घरपोच देण्यासाठी आम्ही क्रेट्सचा वापर करतो, जेणेकडून तुमच्या पर्यंत पोचणाऱ्या वस्तू सुरक्षीत राहाव्यात. या क्रेट्समुळे डिलिव्हरी देणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपनीने सौरभ यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. 

आम्ही आमच्या कंपनीमधील प्रत्येक कामगाराची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही कंपनीने उत्तरात सांगितले. तरी एखाद्या डिलिव्हरी बॉयकडे 15 किलोपेक्षा जास्त वजन दिले आहे, अशी बाब आमच्या ऑडिटमध्ये निदर्शनास आल्यास आम्ही त्यावर त्वरित कारवाई करु अशी हमी देखील कंपनीने दिली आहे. 

Web Title: Bigbasket reacts after post showing alleged inhuman work condition of delivery boy goes viral

टॅग्स