जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल चिनाबवर

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

जम्मू-काश्‍मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, 2019 पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जम्मू-काश्‍मीरमध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू असून, 2019 पर्यंत ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार

 • फिनलंड आणि जर्मनीमधील तज्ज्ञांची मदत
 • कटरा आणि बनिहाल मार्गादरम्यान पुलाचे काम सुरू
 • भूकंपप्रवण क्षेत्र आणि दहशतवाद्यांकडून घातपाताचा धोका असल्याने पूल बांधताना विशेष साहित्याचा वापर
 • दहशतवाद्यांकडून घडविल्या जाणाऱ्या संभाव्य स्फोटांमध्ये तग धरू शकणाऱ्या 63 मिमी. जाड विशेष तारांचा वापर
 • पुलाच्या देखभालीसाठी रोप-वेचीही व्यवस्था
   
 • 1.315 किमी : लांबी
 • 359 मीटर : चिनाबवरील उंची
 • 35 मीटर : आयफेल टॉवरपेक्षा अधिक उंच
 • 12 हजार कोटी : पुलासाठीचा खर्च
 • 1400 : कामगार कामाला
 • 24 हजार टन : पूल बांधणीसाठी लागणारे पोलाद
 • 14 मीटर : रुंदीचा दुपदरी मार्ग
 • 15 वर्षे : टिकणारा रंग दिला जाणार

हे जागतिक दर्जाचे काम असून हा पूल पूर्ण झाल्यावर तो पाहून आणि त्याबद्दल वाचून सर्व जग आश्‍चर्यचकित होईल. अभियांत्रिकी कौशल्याचा हा अप्रतिम नमुना असेल.
- डेव्हिड मॅकेन्झी, वास्तू सल्लागार, ब्रिटन

Web Title: Biggest railway bridge in Jammu