बहुमत सिद्ध करण्याआधी बिहारमध्ये टेन्शन; CM नितीश यांच्या पक्षाचेच 5 आमदार नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar and Tejaswi Yadav

बहुमत सिद्ध करण्याआधी बिहारमध्ये टेन्शन; CM नितीश यांच्या पक्षाचेच 5 आमदार नाराज

पाटणा - बिहारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीतच आमदारांमध्ये असलेली नाराजी चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) चे पाच आमदार मंगळवारी नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचा: गडकरींचे अडवाणी होतायत? संसदीय समितीतून पत्ता कट होण्यामागचं राजकारण!

मंत्रिपद न मिळाल्याने हे आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. सीएम नितीश यांना 24 ऑगस्टला बहुमत सिद्ध करायचे आहे, पण त्याआधी काही आमदारांची नाराजी टेन्शन वाढवणारी आहे.

बिहारमध्ये मंगळवारीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. महाआघाडीच्या ३१ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सर्वाधिक मंत्री राजदच्या खात्यात गेले आहेत. राजदच्या कोट्यातून 16 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. त्याचबरोबर जेडीयूच्या 11 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. तर 2 काँग्रेस, 1 HAM आणि 1 अपक्ष आमदारांने मंत्रिपदाची शपथ घेतली.

हेही वाचा: विनायक मेटेंचा पाठलाग करणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात; गाडीत होते सहा जण

जेडीयूचे नाराज आमदार

1. डॉ. संजीव (परबत्ता विधानसभा)

2. पंकज कुमार मिश्रा (रुन्निसैदपूर)

3. सुदर्शन (बरबिघा)

4. राजकुमार सिंग (मतिहानी)

5. शालिनी मिश्रा

Web Title: Bihar Cabinet Expansion Five Jdu Mla Distanced Themselves Swearing In Ceremony Nitish Kumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..