सोनूला खासगी शाळेत मिळाला प्रवेश

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या अकरावर्षीय चिमुकल्या सोनूला मदत करण्यासाठी समाजकार्य करणारा अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला.
Bihar CM Nitish Kumar Actor Sonu Sood help sonu to get admission in school  Patna
Bihar CM Nitish Kumar Actor Sonu Sood help sonu to get admission in school Patnaesakal

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या अकरावर्षीय चिमुकल्या सोनूला मदत करण्यासाठी समाजकार्य करणारा अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला. त्यामुळे, सोनूला बिहारमधील एका खासगी शाळेत प्रवेश मिळाला असून, त्याची माहिती सोनू सूदने ट्विट करत दिली. त्याचप्रमाणे, भाजप नेते सुशील मोदी यांनी सोनूला दरमहिना दोन हजार रुपये, तर माजी खासदार पप्पू यांनी ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली.

सोनू नालंदा जिल्ह्यात राहतो. त्याची आयएएस होण्याची इच्छा आहे. सरकारी शाळेत शिकणाऱ्या सोनूने शाळेत व्यवस्थित शिक्षण मिळत नसल्याची तक्रार थेट नितीशयांच्याकडे केली होती. शाळेत शिकविले जात नाही. शिक्षक येत नाहीत. इंग्रजीचे शिक्षक इंग्रजी शिकवीत नाहीत, अशी तक्रार त्याने केली होती. बिहारमध्ये दारूबंदी असूनही वडील दारू पीत असल्याचेही त्याने सांगितले होते.

सोनूने सोनूचे ऐकले. हा मुलगा आता बिहारमधील पाटणातील आयडियल इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी बनला आहे. तुझ्या पूर्ण शिक्षणाची आणि वसतिगृहाचीही सोय झाली आहे. सोनू, आता दप्तर भरायला घे.

- सोनू सूद, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com