विरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेट

bihar cm nitish kumar rjd chief lalu yadav meet congress president sonia gandhi in delhi
bihar cm nitish kumar rjd chief lalu yadav meet congress president sonia gandhi in delhi

लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न म्हणून नेत्यांच्या या बैठकीकडे पाहिले जात आहे.

सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही नेते माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आम्ही सोनियाजींशी बोललो, देशातील अनेक पक्षांना एकत्र करून प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचा आमचा विचार असल्याची माहिती दिलीय

सूत्रांचा हवाला देऊन, वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, ही बैठक केवळ विरोधी गट मजबूत करण्यासाठीच नाही तर इतर अनेक कारणांसाठी देखील महत्त्वाची आहे. कारण लालू प्रसाद यादव विरोधकांची एकजूट मजबूत करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून या बैठकीत आश्वासन घेतील असे बोलले जात आहे. तसेच लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधन्याबाबत काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांचे मत जाणून घेत त्यांची संमती घेऊ शकतात, असेही एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

bihar cm nitish kumar rjd chief lalu yadav meet congress president sonia gandhi in delhi
...तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

तीन पक्षांची पाच वर्षांतील पहिली बैठक

काँग्रेस, जेडी(यू) आणि आरजेडी या तीन पक्षांच्या प्रमुखांची गेल्या पाच वर्षांतील ही पहिली अधिकृत बैठक आहे. या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, तर केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या मोहिमेला या बैठकीमुळे बळ मिळू शकते. एनडीएशी फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार आणि सोनिया गांधी यांच्यातील ही बहुधा पहिली भेट असल्याचे बोलले जात आहे.

काही मिडीया रिपोर्टनुसार, लालू यादव आणि नितीश कुमार हे तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), हरियाणात इंडियन नॅशनल लोक दल (INLD), आंध्र प्रदेशात YR काँग्रेस पार्टी, अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, यांच्यासह बहुजन समाज पार्टी (BSP) तसेच ओडिशातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP)आणि नॅशनल कॉन्फरन्सशी देखील चर्चा सुरू करू शकतात.

bihar cm nitish kumar rjd chief lalu yadav meet congress president sonia gandhi in delhi
मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली 'ही' नवीन SUV, वाचा डिटेल्स

रविवारी हरियाणातील फतेहाबाद येथे इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक विरोधी नेते एका मंचावर आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com