दलित विद्यार्थ्याला जादा गुण मिळाल्याने मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

दलित विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जादा गुण मिळत असल्यामुळे त्याला दोघे जण वर्गातच इतर विद्यार्थ्यांसमोर मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाटणा (बिहार)- एका सोळा वर्षांच्या दलित विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळत असल्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

दलित विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जादा गुण मिळत असल्यामुळे त्याला दोघे जण वर्गातच इतर विद्यार्थ्यांसमोर मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपल्याला मारहाण होत असल्याचे दलित विद्यार्थ्याने सांगितले. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. दलित विद्यार्थ्याने नेहमीच्या त्रासाला कंटाळून प्रसारमाध्यमांना पत्र लिहून मारहाण थांबविण्याची विनंती केली आहे.

एका सरकारी शाळेत विद्यार्थ्याला इतर विद्यार्थी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आढळून आला आहे. संबंधित व्हिडिओ कोणी अपलोड केला अन् मारहाण करणाऱया अल्पवयीन मुलांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Bihar Dalit teen attacked by classmates because of his good grades