
बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ४६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानुसार रेणू देवी या बेतियातून तर मिथिलेश तिवारी हे वैकुंठपूर येथून लढणार आहेत.आशा सिन्हा यांना दानापूरमधून उमेदवारी मिळाली आहे.
पाटणा- बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ४६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानुसार रेणू देवी या बेतियातून तर मिथिलेश तिवारी हे वैकुंठपूर येथून लढणार आहेत. आशा सिन्हा यांना दानापूरमधून उमेदवारी मिळाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भाजपने याआधी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २७ जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने बिहारमधील प्रमुख नेते व जमीन व महसूल मंत्री राम नारायण मंडल यांना बांकातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच कामगार मंत्री विजय सिन्हा हे लखीसरायतून आणि कृषी मंत्री प्रेमकुमार गयेतून लढणार आहेत. नेमबाज श्रेयसी सिंह हिने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून तिला पक्षाने जामुईतून तिकीट दिले आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा