पेट्रोल दरवाढीमुळे घोड्यावरून वीजबिल वसुली

शिवहर जिल्ह्यातील जाफरपूर गावात वीज विभागात काम करणारे अभिजित तिवारी यांनी वीजबिल वसुलीसाठी घोडा वापरण्यास सुरुवात केली
bihar electricity department worker abhijit tiwari collecting dues on horse Patna
bihar electricity department worker abhijit tiwari collecting dues on horse Patnasakal

पाटणा : देशात गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत रोजच वाढ होत आहे. त्यामुळे गाड्या चालविण्याचे अवघड होत चालले आहे. इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी बिहारच्या वीज विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने थकीत बिलांच्या वसुलीसाठी दुचाकीऐवजी चक्क घोड्यावर मांड ठोकली आहे.शिवहर जिल्ह्यातील जाफरपूर गावात वीज विभागात काम करणारे अभिजित तिवारी यांनी वीजबिल वसुलीसाठी घोडा वापरण्यास सुरुवात केली आहे.

घोड्यावर बसून वसुली करतानाचे त्यांचे छायाचित्र सोशलमीडियावर व्हायरल झाले आहे. अभिजित याचे वडील शिवशंकर तिवारी यांना घोडे पाळण्याचा छंद आहे. तिवारी म्हणाले, की पेट्रोलच्या दराचा रोज उच्चांक होत आहे. वाढत्या दरामुळे मोटारसायकल चालविणे कठीण झाले आहे. घोड्याच्या रोजच्या खाद्यापेक्षाही पेट्रोल दुपटीने महाग आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी फिरावे लागते. त्यात रोजचे २५० रुपये पेट्रोल खर्च येतो. घरी घोडा असल्याने मला घोडेस्वारी येते. म्हणून महाग पेट्रोल गाडीत भरण्यापेक्षा वसुलीसाठी घोड्यावर जाणे सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com