Loksabha 2019 : राबडी देवींनी कोणाचं समर्थन केलं तर बलात्कार करणाऱयांच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. राजवल्लभ कसा निर्दोष आहे आणि सरकारकडून त्याला कसे फसवण्यात आले आहे हे सांगून त्याचे समर्थन केले आहे.

पाटणा (बिहार): बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचे समर्थन केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. विभा देवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या राबडी देवी यांनी त्यांचा प्रचार करताना राजवल्लभ कसा निर्दोष आहे आणि सरकारकडून त्याला कसे फसवण्यात आले आहे हे सांगून त्याचे समर्थन केले आहे. नवादा येथे प्रचारसभेदरम्यान बोलताना राबडी देवी म्हणाल्या, 'अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरजेडीचा आमदार राजवल्लभ याला सरकारने या प्रकरणात फसवले आणि तुरुंगात टाकले. एवढेच नाही तर असे करून यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.'

राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, राजवल्लभला न्यायालयाने दोषी ठरवले असताना देखील राबडी देवी यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. राजवल्लभ याचा जामीन 24 नोव्हेंबर 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

Web Title: bihar former cm Rabri Devi defends rape convict, campaigns for his wife in Nawada