दुसऱ्याच्या पत्नीसोबत पळून गेल्याने त्याला जाळले जीवंत

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

बिहारमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी जिवंत जाळले आहे. लग्न झालेल्या महिलेसोबत त्याने दुसरे लग्न केल्याने त्या पुरुषाला जिवंत जाळण्यात आले आहे.

पटना- बिहारमध्ये एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी जिवंत जाळले आहे. लग्न झालेल्या महिलेसोबत त्याने दुसरे लग्न केल्याने त्या पुरुषाला जिवंत जाळण्यात आले आहे.

श्रवण महतो असे या मृत तरुणाचे नाव आहे. ओरहलिया गावात राहणाऱ्या श्रवणचे काही वर्षांपूर्वी एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र, त्याचे गावातील स्त्रीशी प्रेमसंबंध होते. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून तिच्याशी पळून जावून लग्न केलं होतं. त्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबियांनी श्रवणविरोधात अपहरणाची तक्रार केली होती. पळून लग्न केल्यानंतर दोघे काही महिन्यांसाठी गावाबाहेर राहिले.

मात्र, नोव्हेंबरमध्ये श्रवण त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत परतल्यानंतर दोघांनी गावाच्या पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. मात्र, काही निर्णय होण्याच्या आधीच श्रवणच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करत जिवंत जाळले. यात श्रवणचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी 14 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: Bihar Man Burnt Alive For Eloping With Married Woman