Bihar With Modi : 'चौकीदार' चोर नाही 'चौकन्ना' आहे - मोदी (व्हिडीओ)

Bihar With Modi Prime Minister Narendra Modi Addresses NDA Rally In Patna
Bihar With Modi Prime Minister Narendra Modi Addresses NDA Rally In Patna

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पटना येथे एनडीएच्या संकल्प रॅलीला संबोधित केले. मोदी म्हणाले, 'चौकीदारला शिव्या देण्याची स्पर्धा सुरु आहे. तुमचा हा चौकीदार संपुर्णपणे जागा आहे, तैनात आहे. सुरक्षा देशातील गरीबाची असो किंवा देशाची, देशाकडे वाईट नजर करणाऱ्या समोर तुमचा हा चौकीदार आणि एनडीए युती छाती ठोकून उभी आहे.'

याप्रसंगी मोदी यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'माझी प्राथमिकता दहशतवाद संपविण्याची आहे आणि त्यांची मला संपविण्याची.' पुढे ते म्हणाले, 'गरीबांची कमाई खाऊन जे (विरोधी पक्ष) स्वतःची कमाई करत होते, ते आता चौकीदारमुळे वैतागले आहेत. त्यामुळे चौकीदाराला शिव्या देण्याची स्पर्धा सुरु आहे. सरकारने जवळपास 50 करोड गरीबांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधेशी जोडले आहे. जवळपास 35 करोड लोकांचे बँक खाते उघडून दिलेत. जवळपास 7 करोड गरीब महिलांना गॅस कनेक्शन दिले गेले. 30 करोड मध्यमवर्गीयांना इनकम टॅक्स पासून मुक्ती मिळाली. दिड करोड पेक्षा जास्त लोकांना अटल पेंन्शन योजनेशी जोडले.'

 



पटना येथे संकल्प रॅलीच्या सभेला उद्देशून मोदी म्हणाले, 'केंद्रातील एनडीए सरकारने देशाला नवीन निती आणि रीति दिली आहे. आता भारत आपल्या वीर जवांनांच्या बलिदानावर शांत बसणार नाही.'

 



काँग्रेस सरकारने योजनांची गती कमी केली होती असेही मोदी म्हणाले. गांधी घराण्याचा गड मानल्या जाणाऱ्या अमेठीत मोदी हे आज रविवारी एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. जवळपास दहा वर्षांनतर मोदी आणि बिहार चे मुख्यमंत्री नीतीश कुमार या रॅलीनिमित्त सभेतील व्यासपीठावर एकत्र आलेत. गेल्या वेळी 2009 मध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान दोघे एकाच मंचावर आले होते. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com