बिहारमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 5 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नालंदा (बिहार) - जलालपूर येथे अवैधरित्या उभारलेल्या फटाक्याच्या एका कारखान्यात आज(शुक्रवार) स्फोट झाला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच 25 जखमी झाले आहेत. पोलिस आणि अग्निशामक घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा कारखाना अवैधरित्या उभारण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Web Title: bihar nalandas jalalpur a blast took place in an illegal firecracker factory 5 dead 25 injured