अहमदाबाद बॉंबस्फोट प्रकरण: फरार तौसिफ अखेर जेरबंद

उज्ज्वल कुमार
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पाटणा: अहमदाबादमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील आरोपी तौसिफ खान याला बिहारमधील गया येथून अटक झाल्यानंतर येथील महाबोधी विहारच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तौसिफसह अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) एक पथक येथे दाखल झाले आहे.

अहमदाबाद बॉंबस्फोटातील सहभागाबद्दल पोलिस अनेक वर्षांपासून तौसिफच्या मागावर होते. अखेर बुधवारी रात्री तौसिफ व अन्य दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक गरिमा मलिक यांनी दिली. अन्य दोघे करमौनी गावचे रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून हे तिघेजण एका सायबर कॅफेत जात होते. तेथे त्यांनी स्वतःची ओळख लपवली होती. सायबर कॅफेच्या मालकास त्यांचा संशय आल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. असेही मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, पितृपक्ष सुरू असल्याने देशविदेशातून असंख्य भाविक गयामध्ये हजेरी लावतात. या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला असून, येथील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

तौसिफची चौकशी
म्याणमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर सुरू असलेल्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी गयामध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचे आमचे नियोजन होते, अशी माहिती तौसिफने चौकशीदरम्यान दिली. रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार करणारे बौद्धधर्मीय असल्याचेही त्याने म्हटले आहे.

Web Title: bihar news Ahmedabad bomb blast absconding Tausif finally arrested